Kokan: ‘पालावरची दिवाळी‘ अंतर्गत फराळाचे वाटप 

0
65
‘पालावरची दिवाळी‘
‘पालावरची दिवाळी‘ अंतर्गत फराळाचे वाटप 

वेंगुर्ला प्रतिनिधी- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुचनेनुसार समाजातील वंचितांना भारतीय हिदू संस्कृती, सण समारंभात सहभागी करून त्यांचे जीवन अधिकाधिक प्रकाशमय करण्यासाठी ‘पालावरची दिवाळी‘ साजरी केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून वेंगुर्ला भाजपाच्यावतीने शहरातील कॅम्प परिसरात असलेल्या कातकरी समाजासोबत ‘पालावरची दिवाळी‘ साजरी करण्यात आली. माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते कातकरी समाजाला फराळाचे वाटप करण्यात आले.https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-धूम-दिग्दर्शक-सं/

यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाई, अॅड.सुषमा खानोलकर, सुहास गवंडळकर, बाबली वायंगणकर, मनवेल फर्नांडीस, सारिका काळसेकर, स्मिता दामले, राधा सावंत, वृंदा मोर्डेकर, वृंदा गवंडळकर, कृपा मोंडकर, सुधीर पालयेकर, शेखर काणेकर, रविद्र शिरसाठ, रफिक शेख, प्रशांत आपटे, प्रणव वायंगणकर, असलम शेख, यश मोंडकर उपस्थित होते.

फोटोओळी – कातकरी वस्तीमध्ये ‘पालावरची दिवाळी‘ साजरी करताना त्यांना फराळाचे वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here