Kokan: मसुरे सुपुत्र उद्योजक डॉ. दीपक परब यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स कोकण विभागाच्या उपाध्यक्षपदी तर अध्यक्ष पदी ललित गांधी बिनविरोध निवड

0
49
मसुरे सुपुत्र उद्योजक डॉ. दीपक परब
मसुरे सुपुत्र उद्योजक डॉ. दीपक परब यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स कोकण विभागाच्या उपाध्यक्षपदी तर अध्यक्ष पदी ललित गांधी बिनविरोध निवड.

गव्हर्निंग कौन्सिलचे ९० पैकी 85 जागा वरील उमेदवार विजयी….. – – – –

मसुरे/ प्रतिनिधी
राज्याच्या व्यापार उद्योगाची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चरच्या द्वैवार्षिक निवडणुकीची मुंबई येथे संपूर्ण राज्यातील मतमोजणी नुकतीच पूर्ण झाली. त्यात विद्यमान अध्यक्ष श्री ललित गांधी आणि ट्रस्ट बोर्डचे चेअरमन आशिष पेडणेकर यांच्या नेतृत्वाखालील शेठ वालचंद हिराचंद प्रगती पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व मिळविले. विद्यमान अध्यक्ष ललित गांधी यांनी पुन्हा अध्यक्ष आणि मसुरे गावचे सुपुत्र डॉक्टर दीपक परब यांची कोकण विभाग उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली..https://sindhudurgsamachar.in/kokan-वायरी-भुतनाथ-येथील-विक्र/

या वेळी व्यवस्थापन समितीला 10 पैकी 8 जागावर आणि गव्हर्निंग कौन्सिलच्या 90 पैकी 85 जागांवर गांधी यांच्या पॅनेलचे उमेदवार विजयी झाले. वरिष्ठ उपाध्यक्षपदी रवींद्र माणगावे (सांगली ) यांनी 1605 मतासह तर मुंबई विभागाच्या उपाध्यक्षपदी करुणाकर शेट्टी यांनी 135 मतांनी विजय मिळविला. या प्रगती पॅनलच्या विजयी झालेल्या अन्य उपाध्यक्षांमध्ये पश्चिम महाराष्ट्र विभागातून रमाकांत मालू, दिलीप गुप्ता, उत्तर महाराष्ट्र विभागातून संजय सोनवणे, संगीता पाटील आणि कोकण विभागातून श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांचा समावेश आहे. अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्र चेंबरच्या 98 वर्षाच्या इतिहासात प्रथमच गतचाळीस वर्षातील सर्व 11 माजी अध्यक्षांच्या पुढाकाराने एकता पॅनेलची स्थापना करून निवडणूकित गांधी यांच्यासह कडवे आवाहन निर्माण केले होते. ललित गांधी यांनी कौशल्य पूर्ण नियोजनाद्वारे विरोधातील पॅनलचा पराभव करत महाराष्ट्र चेंबर स्वर निर्विवाद वर्ष स्वस्थापित करून एक हाती सत्ता काबीज केली. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अधिकारी सुरेश घोरपडे, सहाय्यक निवडणूक अधिकारी जे. के. पाटील यांनी काम पाहिले. निवडणूक समितीवर रमेश रंका, उत्तम शहा तर तक्रार निवारण समितीवर माजी अध्यक्ष अरविंद जोशी, अरुण ललवाणी, धनंजय दुगे यांनी काम पाहिले.

यावेळी बोलताना महाराष्ट्र चेंबरचे विद्यमान अध्यक्ष ललित गांधी म्हणाले महाराष्ट्र चेंबरच्या निवडणुकीतील या बहुमताबद्दल आणि निर्विवाद विजयाबद्दल राज्यभरातील सभासदांचे आभार मानतो. गेल्या दोन वर्षात केलेल्या झंजावती कार्याची पोचपावती दिल्याबद्दल हा विजय सर्व सभासदांना अर्पण करत आहे.कोकण विभागाच्या उपाध्यक्षपदी मसुरे गावचे सुपुत्र डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांची बिनविरोध निवड झाली डॉक्टर दीपक परब हे उद्योजक असून सामाजिक क्षेत्रासहित उद्योग क्षेत्रातही त्यांचे भरीव असे योगदान आहे यावेळी बोलताना दीपक परब म्हणालेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या कोकण विभाग उपाध्यक्षपदी आज माझी बिनविरोध निवड केल्याबद्दल सर्वप्रथम या चेंबरच्या सर्व सभासदांचे आणि ही निवड बिनविरोध होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचा मी ऋणी आहे मिळालेल्या संधीतून महाराष्ट्र चेंबर ची मान नेहमीच उंच करण्याचा प्रयत्न करेन तसेच सर्व सभासदांना सोबत घेऊन यापुढे कार्य करत राहीन…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here