Kokan: मातोंड येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
24
रक्तदान शिबिर,
मातोंड येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्ला प्रतिनिधी – ग्रामपंचायत मातोंड आणि युवा रक्तदाता मित्रमंडळ-मातोंड यांच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रक्तदान शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. https://sindhudurgsamachar.in/kokan-आशालता-वारंग-यांचे-वृद्/

      उद्घाटन सरपंच मयुरी वडाचेपाटकर यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ.संजीव लिंगवतग्रामपंचायत सदस्य राहुल प्रभूदिपेश परबवैभवी परबखरेदी विक्री संघ चेअरमन ज्ञानेश्वर केळजीसोसायटी संचालक एम.जी.मातोंडकरसिद्धार्थ पराडकरमहेश वडाचेपाटकर आदी उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी रक्तपेढीचे डॉ.पटेलमानसी बागेवाडीप्राजक्ता रेडकरराजेंद्र गोराअनिल खाडेराहुल जाधव यांचे सहकार्य लाभले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र व कै. पांडुरंग महादेव नाईक यांच्या स्मरणार्थ साहिल नाईक यांच्यामार्फत सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

      शिबिराला सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष राजेश पेडणेकरसचिव श्रीकृष्ण कोंडस्करखजिनदार भूषण मांजरेकरभाजप तालुका कार्यकारीणी सदस्य वसंत तांडेलयुवा मोर्चा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकरतालुका उपाध्यक्ष मनोहर तांडेलदशरथ गडेकर यांनी भेटदेऊन शुभेच्छा दिल्या. शिबिर यशस्वी होण्यासाठी सरपंच मयुरी वडाचेपाटकरसदस्य राहुल प्रभूदीपेश परबबाबली गवंडेसिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वेंगुर्ला तालुका कार्यकारीणी सदस्य प्रसाद नाईकसचिन कोंडयेनितीन परब-तळवडेकरसाहिल परबकाशी परबसाहिल नाईकदेवेश परबवासुदेव परबदिगंबर मातोंडकर यांनी मेहनत घेतली.

फटोओळी – रक्तदान शिबिराचे उद्घाटन सरपंच मयुरी वडाचेपाटकर यांच्या हस्ते झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here