Kokan: म्हापण येथील पत्रकार संदिप चव्हाण यांचा ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत यांच्या हस्ते सत्कार

0
18
पत्रकार संदिप चव्हाण यांचा ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत यांच्या हस्ते सत्कार
पत्रकार संदिप चव्हाण यांचा ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत यांच्या हस्ते सत्कार

सावंतवाडी/सुनिता भाईप-:वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रम शुभारंभ कार्यक्रम श्रीराम वाचनालय सावंतवाडी येथे पार पडला. यावेळी म्हापण येथील दैनिक सकाळ वृत्तपत्र पत्रकार संदिप चव्हाण यांनी २०२३/२४ या शैक्षणिक वर्षापासून मिळविलेल्या यशा बद्दल दैनिक तरुण भारतचे ज्येष्ठ पत्रकार सिंधुदुर्ग रत्नागिरी आवृत्तीचे संपादक शेखर सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.https://sindhudurgsamachar.in/kokan-निवती-मेढा-ग्रामपंचायत-ड/सैनिक

यावेळी बोलताना करियर किंवा पॅशन म्हणून पत्रकारितेत यायचं असेल तर जरूर या. पण केवळ पैसा कमवायचा एवढंच ध्येय ठेवू नका. आपण चौथा स्तंभ आहोत या जबाबदारीने काम करा, स्वतःमधील पत्रकार मरू देऊ नका ग्रुप जर्नालिझम टाळून प्रत्येक पत्रकाराने चिकित्सक पत्रकारीतेला महत्त्व द्यायला हवे असे प्रतिपादन त्यांच्याकडून करण्यात आली.

यावेळी प्रवक्ते म्हणून पत्रकारिता विद्यार्थी आणि उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले.तसेच .यावेळी श्रीराम वाचन मंदिर अभ्यासक्रमाचे केंद्रप्रमुख रमेश बोंद्रे ,अमोल टेंबकर ,हरिश्चंद्र पवार ,डॉ.जी. ए. बुवा ,प्रा. रुपेश पाटील आदींनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय मनोगतात गजानन नाईक यांनी पत्रकार म्हणजे काय? पत्रकारिता जन्म कसा झाला याविषयीचे मार्गदर्शन केले तसेच या क्षेत्रात येण्यासाठी इच्छुकांना पत्रकारिता पदविका कोर्सचे लाभ घेण्याचे आवाहन केले.

यावेळी तरुण भारत संवाद चे संपादक शेखर सामंत ,श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, सहकार्याध्यक्ष डॉ. जी. ए .बुवा ,अ.भा .मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष अमोल टेंबकर, केंद्रप्रमुख रमेश बोंद्रे, केंद्र संयोजक राजेश मोंडकर ,सामाजिक कार्यकर्ते ऍड. नकुल पार्सेकर, वाय पी नाईक, रवी जाधव, पत्रकार दीपक गांवकर, प्रा.रुपेश पाटील अनिल भिसे, संदिप चव्हाण,विनायक गावस ,भुवन नाईक ,अनुजा कुडतडकर ,प्रसाद माधव साबाजी परब आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश मोंडकर, सूत्रसंचालन मंगल नाईक- जोशी, यांनी तर आभार विद्या सामंत यांनी मांनले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here