वेंगुर्ला प्रतिनिधी- आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला-कॅम्प मैदानावरील बॅडमिटन हॉलमध्ये वेंगुर्ला भाजपाच्यावतीने योग दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन बॅ. खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य एम.बी.चौगुले यांनी केले. https://sindhudurgsamachar.in/kokan-पोस्ट-कर्मचा-यांनी-साजरा/
योग शिक्षिका साक्षी बोवलेकर हिने उपस्थितांकडून योगाचे प्रकार करवून घेत योगाभ्यासाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, सुजाता पडवळ, वृंदा गवंडळकर, वृंदा मोर्डेकर, श्रेया मयेकर, उर्वी गावडे, सुरेंद्र चव्हाण, रवींद्र शिरसाट यांच्यासह रोटरी क्लब, माझा वेंगुर्ला, बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील शिक्षक व एन.सी.सी.कॅडेट, डॉक्टर, वकिल, खेळाडू तसेच नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सहसंयोजक अॅड.सुषमा प्रभूखानोलकर यांच्या हस्ते योगशिक्षिका साक्षी बोवलेकर हिचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. स्वागत कार्यक्रमाचे संयोजक दिलीप गिरप यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रशांत आपटे यांनी मानले.
फोटोओळी – कॅम्प येथे भाजपाच्यावतीने योगाभ्यास घेण्यात आला.