Kokan: राष्ट्रीय बहुभाषिक साहित्य कला पर्यटन सामाजिक संमेलन २६ मे रोजी माल येथे

0
22
उद्घाटन ,
राष्ट्रीय बहुभाषिक साहित्य कला पर्यटन सामाजिक संमेलन २६ मे रोजी मालवण येथे..

⭐उद्योजक डॉक्टर दीपक परब,हेमंत कोळबकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार…

मालवण-मसुरे/ प्रतिनिधी

सिंधुदुर्गच्या कणखर लाल मातीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत कर्तबदार अनन्यसाधारण समाजसेवेची परंपरा आणि उत्तुंग विचारधारा असणाऱ्या रत्नांची ओळख होण्यासाठी तसेच त्यांच्या अंतर्भूत प्रतिभेला वाव मिळण्यासाठी किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग यांच्यासंयुक्त राष्ट्रीय बहुभाषिक साहित्य,कला, पर्यटन, सामाजिक संमेलन व सन्मान सोहळ्याचे आयोजन मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे २६ मे रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट डिझाईन इंडो स्पेस लॉजिस्टिक पार्क प्रायव्हेट लिमिटेड चे आर्किटेक्चर नीलिमा गुप्ता हे भूषवणार आहेत. https://sindhudurgsamachar.in/kokan-महाराष्ट्र-नवनिर्माण-से/

या कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध उद्योजक, शिक्षणमहर्षी, समाजसेवक डॉ. दीपक परब तसेच मानसोपचार तज्ञ व उद्योजक हेमंत कोळंबकर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्गाचे सुपुत्र पद्मश्री परशुराम गंगावणे, अभिनेते व दिग्दर्शक श्री. संजय मोहिते, अभिनेत्री नृत्यदिग्दर्शिका डॉ. राजश्री खटावकर, गोव्याचे सुप्रसिद्ध गझल संगीतकार अजय नाईक, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अ.ना. रसनकुटे, मालवण येथील निवृत्त वैद्यकीय अधिकारी (स्त्री रोग तज्ञ), डॉ. अच्युत सोमवंशी हे मान्यवर लाभणार आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील महनीय व्यक्तींची उपस्थितीमध्ये कौशिक गायकवाड, मोहोळ नाट्य अभिनेते नाना कोळंबकर, मच्छिंद्रनाथांची तपोभूमी चे व्यवस्थापक प्रभाकर सावंत, ज्येष्ठ साहित्यिक बाबला पिंटो, कणकवलीचे उद्योजक सुधीर जाधव, मुरबाड येथील समाजसेवक दिनेश उघडे, ठाणे येथील चित्रपट निर्मात्या सौ. नेहा निनाद धुरी, रत्नागिरी येथील नृत्य प्रशिक्षक अशोक आखाडे असून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून कोकण जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

या संमेलनामध्ये सुप्रसिद्ध गोव्याचे संगीतकार अजय नाईक यांचा गझलरंग हा गाण्याचा कार्यक्रम सकाळी संपन्न होणार आहे तसेच सिंधुदुर्गातील पारंपरिक कलांचा अविष्कार पहावयास मिळणार आहे.तसेच उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या व्यक्तीचा व संस्थांचा सत्कार होणार आहे. विविध भाषातील 11 पुस्तकांचे प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पाडणार आहे, अशी माहिती संमेलनाचे आयोजक किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग चे अध्यक्ष व कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्रा.डाॅ.बी.एन खरात यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here