वेंगुर्ला/ प्रतिनिधी- वेंगुर्ला येथील दिवाणी न्यायालयात संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ३० प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला व तालुका बार संघटना, वेंगुर्ला यांचे संयुक्त विद्यमाने २८ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/kokan-जयवंत-दळवी-जन्मशताब्दी-व/
याचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश डी.वाय.रायरीकर, अॅड.एस.जी.ठाकूर, पॅनेल सदस्य व पक्षकारांच्या हस्ते झाले. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दिवाणीकडील १, फौजदारीकडील ९ तर विविध बँका व विद्युत विभाग यांच्याकडील २० अशी एकूण ३० प्रकरणे तडजोडीने मिटवून सुमारे ५७ हजार १२८ एवढी रक्कम वसुल करण्यात आली. यावेळी न्यायालयाचे सहाय्यक अधिक्षक एस.एस.कांबळे, एस.के.खेडेकर, वकिल वर्ग, पक्षकार व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.