Kokan: : देवगड तालुक्यातील शिरगाव गावचे सुपुत्र शिवाजी साटम यांचे निधन

0
34
देवगड तालुक्यातील शिरगाव गावचे सुपुत्र शिवाजी साटम यांचे निधन
देवगड तालुक्यातील शिरगाव गावचे सुपुत्र शिवाजी साटम यांचे निधन

प्रतिनिधी – पांडुशेठ साटम

शिरगाव- : देवगड तालुक्यातील शिरगाव गावचे सुपुत्र व मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. शिवाजी वासुदेव साटम (७८) यांचे शिवाजी साटम शनिवारी अल्पशा आजाराने वसई येथे निधन झाले. शिरगाव येथील शैक्षणिक चळवळीत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईच्या जडणघडीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. https://sindhudurgsamachar.in/kokan-राष्ट्रीय-बहुभाषिक-साहि/

त्यांनी संस्थेचे चिटणीस, उपाध्यक्ष, स्थानिक शाळा समिती अध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भूषविली. संस्थेतील आपल्या ५० वर्षांच्या कार्यकाळात गरीब होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी नेहमीच मदतीचा हात दिला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, मुलगा, सून, नातवंडे व जावई असा परिवार आहे. संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. पी.व्ही. साटम यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here