Kokan: वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाचा शुभारंभ

0
43
वाचन संकल्प,
वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाचा शुभारंभ

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l वेंगुर्ला l प्रतिनिधी-

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, त्यांना महत्त्वाच्या ग्रंथांची जाणीव करून देणे या उद्देशाने बॅ.खर्डेकर महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा‘ या उपक्रमाला प्रारंभ झाला आहे. यावेळी सामुहिक वाचन व ग्रंथ प्रदर्शन घेण्यात आले.https://sindhudurgsamachar.in/kokan-लोरे-नं-२-जि-प-विभागाच्या/

  प्रत्येक विद्यार्थ्यांने वाचनाच्या सवयीला जीवनाचा एक भाग बनवावे असे आवाहन प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले यांनी उद्घाटनप्रसंगी केले. ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा‘ या उपक्रमांतर्गत विविध प्रकारची पुस्तके प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत. या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना विविध शास्त्र, कला, आणि साहित्य विषयक पुस्तके सहज उपलब्ध झाली आहेत. त्याचप्रमाणे सामूहिक वाचन सत्रही आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी एकत्र येऊन विविध लेखकांच्या कादंब-या आणि ग्रंथांचे वाचन केले.

  दि.१ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान विविध उपक्रम महाविद्यालय आयोजित केलेले असून याच्या पूर्ततेसाठी प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली समिती गठित केलेली असून या समितीचे चेअरमन पा.डॉ.एम.एम. मुजुमदार (इंग्रजी विभाग),  प्रा.चुकेवाड (मराठी विभाग), प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर (हिंदी विभाग) आणि एन.एस.एस. विभाग प्रमुख म्हणून प्रा.डॉ.पी आर. गावडे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. महाविद्यालयांकडून ग्रंथपदर्शन, सामुहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचक लेखक सुसंवाद, पुस्तक परिक्षण व पुस्तक कथन स्पर्धा, ग्रंथदिंडी, वाचन संवाद, नगर वाचनालय भेट आधी उपक्रम घेतले जाणार आहेत.

फोटोओळी – बॅ.खर्डेकर महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा‘ या उपक्रमाला प्रारंभ झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here