वायरी- प्रतिनिधी - पांडुशेठ साटम
वायरी- भूतनाथ मोरेश्वरवाडी येथील विक्रम गोपाळ तोडणकर यांच्या राहत्या घरास आज रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. यात घरासह, आतील सर्व साहित्य, रोख रक्कम जळून खाक झाली. त्यामुळे तोडणकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून आमदार वैभव नाईक यांनी आज दुपारी तातडीने याठिकाणी भेट देत घराची पाहणी केली. तसेच काही प्रमाणात आर्थिक मदत करीत तोडणकर कुटुंबियांना धीर दिला. https://sindhudurgsamachar.in/kokan-कोंगळे-शाळेत-प्रवेशोत्स/
यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, सरपंच भगवान लुडबे, उपसरपंच नाना नाईक, शाखा प्रमुख जयवंत लुडबे, चिंतामणी मयेकर,दाजी जोशी,चंदू प्रभू, नितीन तोडणकर,श्री खोबरेकर, भूपेंद्र तोडणकर,रवी मेस्टर आदी उपस्थित होते.