Kokan: वारक-यांसाठी देवदर्शन सहलीचे आयोजन  विशाल परब यांच्याकडून अभिवचनाची पूर्तता

0
37
मोहिनी एकादशी,
वारक-यांसाठी देवदर्शन सहलीचे आयोजन - विशाल परब यांच्याकडून अभिवचनाची पूर्तता

वेंगुर्ला प्रतिनिधी– मोहिनी एकादशीनिमित्त चांदेरकर विठ्ठल मंदिरात आयोजित कार्यक्रमात भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी नारायण राणे हे विजयी झाल्यावर वारकरी मंडळींना मोफत देवदर्शन सहल घडविण्याचे अभिवचन दिले होते. त्या अभिवचनाची पूर्तता करताना वेंगुर्ला तालुक्यातील वारकरी मंडळींसाठी देवदर्शन सहल आयोजित करून दिली असून ही देवदर्शन सहल १५ जून रोजी रवाना झाली आहे. यात वेंगुर्ला तालुक्यातील ४५ वारकरी सहभागी झाले आहेत. https://sindhudurgsamachar.in/kokanअंमली-पदार्थ-विरोधात-पोल/

      तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर, नृसिहवाडी, महालक्ष्मी अशी तीन दिवसांची सहल असून याचा शुभारंभ विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी प्रसन्ना देसाई, राजन गिरप, वसंत तांडेल, मनोहर तांडेल, सुहास गवंडळकर, बाबली वायंगणकर, सुरेंद्र चव्हाण यांच्यासह वारकरी सांप्रदायातील जेष्ठ मंडळी, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी विशाल परब यांनी वारकरी मंडळींचे आशीर्वादही घेतले.

फोटोओळी – वारक-यांसाठी आयोजित देवदर्शन सहलीचा शुभारंभ विशाल परब यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here