Kokan: वेंगुर्ल्यात ठिकठिकाणी वटपौर्णिमा उत्साहात साजरी

0
22
वटपौर्णिमा ,
वेंगुर्ल्यात ठिकठिकाणी वटपौर्णिमा उत्साहात साजरी

वेंगुर्ला प्रतिनिधी – वटसावित्री दिवशी सुवासिनी महिला वडाची पूजा करुन आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. हा वटपौर्णिमेचा सण तालुक्यासह शहरात महिलांनी उत्साहात साजरा केला. काही महिलांनी वटवृक्षाकडे एकत्र येत तर काही महिलांनी घरोघरी वडाच्या फांदीचे पूजन केले.  https://sindhudurgsamachar.in/kokan-कोकण-रेल्वेची-परिपूर्ण-स/

वेंगुर्ला शहरात साकव व घोडेबांव उद्यान येथे सकाळपासूनच महिलांची वर्दळ दिसत होती. ब्राह्मणांच्या मंत्र घोषात महिलांनी वटवृक्षाची पूजा केली. नविन लग्न झालेल्या नवदांपत्यांची ही पहिलीच वटपौर्णिमा होती. त्यामुळे अशा नवदांपत्यांनी एकत्रित वटवृक्षाची पूजा केली. महिलांनी वडाला सुत गुंडाळून आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर एकमेकांना रानमेव्यांचे वाण देऊन शुभेच्छा दिल्या.

फोटोओळी – वेंगुर्ला साकव येथील वटवृक्षाजवळ महिलांनी एकत्र येत वटपौर्णिमा साजरी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here