कुडाळ:-प्रतिनिधी-:-श्री सद्गुरू राऊळ महाराज श्री क्षेत्र पिंगुळी येथे निक्षय मित्र संकल्पने अंतर्गत श्री सुवर्णाजी गोपाळ आमोणकर परिवार,श्री सद्गुरु राऊळ महाराज संस्थान, श्री प.पू. विनायक अण्णा राऊळ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने निक्षय मित्र कार्यक्रम सादर करण्यात आला या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील 101 गरीब , गरजू व निराधार क्षयरुग्णांना मोफत सहा महिने धान्य वाटप करण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-महाराष्ट्रात-भाजपाच्य/
यावेळी अध्यक्ष सौ संगीता राऊळ (बाईमा), श्री विठोबा राऊळ(कार्याध्यक्ष), डॉ सई धुरी (जिल्हा आरोग्य अधिकारी), डॉ संदेश कांबळे (तालुका आरोग्य अधिकारी) ,डॉ हर्षल जाधव (जिल्हा क्षयरोग अधिकारी), दशरथ राऊळ (कोषाध्यक्ष),राजन पांचाळ सचिव,गिरीधर राऊळ, विकास शेटे ,मुकुंद राऊळ ,प्रकाश पिंगुळकर,संतोष आळवे, विनायक प्रभू (पुरोहित), डॉ अनंत सामंत, शरद राऊळ ,शिवराम राऊळ आदी विश्वस्त उपस्थित होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सई धुरी यांनी मनोगत व्यक्त केले.श्री दशरथ राऊळ व डॉ हर्षल जाधव यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे आभार डॉ संदेश कांबळे यांनी मानले.