Kokan: सप्ताहाच्या माध्यमातून सहकार वाढवा! एम.के.गावडे

0
35
sahakar saptah
वेंगुर्ला येथील सहकार मेळाव्याचे उद्घाटन श्रीपाद दामले व एम.के.गावडे यांच्या हस्ते झाले

वेंगुर्ला प्रतिनिधी- शासन आज विविध उद्योगासाठी आर्थिक सहकार्य करीत आहे. आपला आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सर्वांनी आज सहकाराच्या माध्यमातून छोटे मोठे उद्योग करणे आवश्यक आहे. एकमेका सहाय्य करू यादृष्टीने सहकाराचे महत्व असून अखिल भारतीय सहकार सप्ताहाच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन सहकार वाढवून उद्योगाच्या माध्यमातून आपली आर्थिक उन्नत्ती करावी, असे प्रतिपादन सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते एम.के.गावडे यांनी वेंगुर्र्ला येथे बोलताना व्यक्त केले. https://sindhudurgsamachar.in/kokan-व्यापा-यांच्या-पाठीशी-ठा/

जिल्हा उद्योग केंद्र ओरोस जिल्हा सहकारी बोर्ड, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने काथ्या संस्था येथे सहकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले व एम.के.गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाचे सुभाष तळवडेकर, तालुका सहकार अधिकारी प्रशांत साळगावकर, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र प्रकल्प अधिकारी आर.ए.गावडे, सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाचे एम.आर.पांचाळ, महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे वेंगुर्र्ला शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर, सुरज परब, सावित्रीबाई फुले संस्थेच्या प्रविणा खानोलकर, सुरंगी महिला औद्योगिक संस्थेच्या सुजाता देसाई आदी उपस्थित होते.

श्रीपाद दामले म्हणाले, विकास प्रक्रियेत सहकार हा महत्त्वाचा घटक असून जास्तीत जास्त उद्योगधंदे निर्माण झाले तरच विकास शक्य आहे. उद्योजक एम.के.गावडे, प्रज्ञा परब यांनी काथ्या उद्योगाच्या माध्यमातून वेंगुर्ला तालुक्यात साम्राज्य निर्माण केले आहे. नवउद्योजकांनी आपल्या कुटुंबाची प्रगती होईल यादृष्टीने शासनाच्या व जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घेऊन त्याचा योग्य विनियोग करून उद्योग करावा. सहकारातून छोटे मोठे उद्योग निर्माण झाल्यास आपला भारत देश आगामी काळात आणखी प्रगती करेल, असेही ते म्हणाले.
फोटोओळी – वेंगुर्ला येथील सहकार मेळाव्याचे उद्घाटन श्रीपाद दामले व एम.के.गावडे यांच्या हस्ते झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here