Kokan: वालावल ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत स्मार्ट प्रीपेड मीटर च्या विरोधाचा ठराव

0
19

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l कुडाळ- वालावल

दि.२६ जानेवारी २०२५ रोजी कोरम अभावी तहकूब झालेली वालावल ग्रामपंचायतीची ग्रामसभा आज दिनांक ०६ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न झाली. वालावल ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत घरगुती वीज मीटर जोडणीला स्मार्ट प्रीपेड मीटर बाबत ग्रामस्थांनी तीव्र निषेध करून ” हे अदानीचे स्मार्ट प्रीपेड मीटर आम्हाला आमच्या गावात नको.” अशी मागणी केली आणि या स्मार्ट प्रीपेड मीटरला विरोधाचा ठराव ग्रामस्थांच्या मागणीनुसार घेण्यात आला. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-जिल्हा-वार्षिक-योजनेती/

शेतकऱ्यांना विविध विकास योजनांसाठी ७/१२ला आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे. ७/१२ला आधार कार्ड लिंक करून लाभार्थ्यांची यादी सादर करण्यात यावी, अशी सूचना गाव तलाठी यांनी ग्रामसभेत ग्रामस्थांना केली. त्यासाठी वारस-तपास करून घेणे आवश्यक असल्याचे सांगून, पोलीस पाटील, ग्रामपंचायत दाखला ही कागदपत्रे आवश्यक असल्याच्या सूचना देऊन आपण सहकार्यासाठी तयार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.वालावल-कवठेवाडी येथे पाणीपुरवठा करणारी जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा साठवण करणारी टाकीची लोखंडी प्लेट बसवण्यात आली होती, ‘ती’ गावातील एका ग्रामस्थांनी काढून नेली. ” मी काढलय मी लावनय नाय” असे त्याने स्पष्ट शब्दात सांगितले. ग्रामपंचायतच्या बऱ्याच योजना येतात. त्याचा लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही, ज्या योजनांचा लाभ मिळणार आहे अशा योजनांची परिपत्रके व्हाट्सअप ग्रुप वर प्रसिद्ध करा, वार्ड सदस्यांच्या ग्रुपला, ग्रामपंचायत कर्मचारी प्रशासन सदस्य संबंधित ग्रुप वर अशी परिपत्रके प्रसिद्ध करावीत, अशा सूचना देऊन अध्यक्ष साहेबांनी, शासनाच्या योजनांचा प्रचार व प्रसार करण्यावालावल ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत स्मार्ट प्रीपेड मीटर च्या विरोधाचा ठराव साठी व्हाट्सअप ग्रुप आवश्यक असल्याचे मान्य केले. या कामी माजी सरपंच ‘निलेश साळसकर’ मदत करतात त्यांची मदत घ्यावी. वार्ड सदस्यांनी योजनांची लाभार्थ्यांपर्यंत प्रसिद्धी पोहोचवण्यात त्यांनी एडमिन राहावे, अशा सूचना दिल्या.

कामाच्या अतिव्यस्ततेमुळे मात्र, यावेळीही ते या ‘ग्रामसभे’ची वार्ड ग्रुप वर प्रसिद्धी होणेचे राहून गेले. त्यामुळे काही ग्रामस्थ मतदार , ‘मतदारांचे हक्काचे व्यासपीठ’ असलेल्या ग्रामसभेत आपली बाजू मांडण्यापासून वंचित राहिले. कवठेवाडी पाणीपुरवठा करणारी टाकीची लोखंडी प्लेट अशाप्रकारे दडपशाहीने नेणे चुकीचे आहे. एकदा त्यांना सांगूया. यासंबंधीची तक्रार पाण्याअभावी होती. बागायतीचे प्रचंड नुकसान होत आहे. याबद्दल ‘पोलीस निरीक्षक’ नियुक्ती पोलीस ठाणे यांचे कडे तक्रार करून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा. पालकमंत्र्यांकडे ही तक्रार देण्यात यावी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. असे ठरलेवालवल मधील 11 कलावंतांना त्रयी राणेंच्या माध्यमातून मानधन मिळणार आहे. अशी माहिती सरपंचांनी यावेळी दिली. वालावल समतानगर मध्ये हायमास्ट ची सुविधा करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. सिंचन विहिरींचे एकूण सात प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. सिंचन विहिरींसाठी पाच लाख ही रक्कम पुरेशी असून आपल्या मार्फत सात विहिरी उपलब्ध आहेत.मोदी आवास योजनेचे घरकुल प्रस्ताव सदस्यांनी आपापल्या वॉर्डात शोधून द्यावेत, अशा सूचनाही अध्यक्षांनी केल्या. वालावल हायस्कूल रस्ता डांबरीकरण मागणीचे पत्र ग्रामसभेत सादर करण्यात आले सदर रस्त्याची वालावल ग्रामपंचायत दप्तरी 23 नंबरला ग्रामपंचायत दप्तरी नोंद घालावी. अशा वारंवार शाळा प्रशासनात सूचना देऊनही नोंद घातली गेली नाही, अशी माहिती यावेळी सरपंचांनी दिली. तर आता रस्ता कसा होणार? असा सवाल यावेळी सरपंचांनी उपस्थित केला.आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी शासनाच्या योजनांची माहिती देणे विद्यार्थ्यांना साथीच्या रोगाबद्दल माहिती देणे जीवीएस च्या रोगाबाबत जनजागृती करणे अशा विषयांवर विस्तीर्ण चर्चा ग्रामसभेत झाली. त्वचा, श्वसन, डोळे या भागांवर परिणाम करणाऱ्या जेसीबी रोगाबद्दल माहिती देण्यात आली.वालावल ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत स्मार्ट प्रीपेड मीटर च्या विरोधाचा ठराव आहेत. सिंचन विहिरींसाठी पाच लाख ही रक्कम पुरेशी असून आपल्या मार्फत सात विहिरी उपलब्ध आहेत.मोदी आवास योजनेचे घरकुल प्रस्ताव सदस्यांनी आपापल्या वॉर्डात शोधून द्यावेत, अशा सूचनाही अध्यक्षांनी केल्या. वालावल हायस्कूल रस्ता डांबरीकरण मागणीचे पत्र ग्रामसभेत सादर करण्यात आले सदर रस्त्याची वालावल ग्रामपंचायत दप्तरी 23 नंबरला ग्रामपंचायत दप्तरी नोंद घालावी. अशा वारंवार शाळा प्रशासनात सूचना देऊनही नोंद घातली गेली नाही, अशी माहिती यावेळी सरपंचांनी दिली. तर आता रस्ता कसा होणार? असा सवाल यावेळी सरपंचांनी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here