🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l नाशिक l 06 जानेवारी
नाशिक जिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच दिवसांचे बाळ चोरीला गेल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. ज्या महिलेने बाळ चोरले त्या महिलेने बाळाच्या आईशी काही तासांपूर्वीच ओळख निर्माण केली होती. मात्र डिस्चार्जच्या वेळी या महिलेने संधी साधत पाच दिवासांचे बाळच गायब केले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांत या बाळाला पुन्हा आईच्या कुशीत परत आणले.https://sindhudurgsamachar.in/kokan-हुमरमळा-येथील-आंदुर्ले-म/
मूळचे उत्तर प्रदेशचे व सध्या सटाणा परिसरात वास्तव्यास असणाऱ्या शेख कुटुंबातील सुमन अब्दुल खान हिची २९ डिसेंबरला नाशिक जिल्हा रुग्णालयात प्रसुती झाली. बाळ बेबीकेअर युनिटमध्ये होते. त्याच दरम्यान तेथील एका संशयीत महिलेने सुमन शेख हिच्या ओळख निर्माण केली. चार पाच दिवस शेख कुटुंबासोबत या महिलेने गोड बोलणे सुरु ठेवले. तिचे नातलग शेजारच्या वार्डमध्ये अँडमिट आहे, असे तिने सांगितले होते. मात्र सुमन शेख हिच्या डिस्चार्जच्या दिवशी या महिलेने संधी साधली.
बाळ व मातेची प्रकृती ठणठणीत असल्याने दोघांनाही शनिवारी डिस्चार्ज देण्याचे जिल्हा रूणालयाने सांगितले. त्यानुसार बाळाचे वडील रुग्णालयात डिस्चार्ज व कागदपत्रांची पूर्तता करत होते. त्याचवेळी महिला बाळाच्या आईजवळ आली. बोलणे सुरु असतानाच संशयित महिलेने बाळंतीणीचे कपडे, साहित्य व बाळाला मी सांभाळते व परिसरात फिरवून आणते, असे सांगितले. मातेचा तिच्यावर विश्वास असल्याने व तोंडओळखीने तिने बाळ महिलेकडे सोपविले. त्याचवेळी बाळाची आई सामान आवरत असताना महिलेने बाळाच्या आईच्या विश्वासघात करुन काही क्षणांत बाळ चोरुन पळ काढला.
पोलिसांची तत्परता
घटनेची माहिती कळताच पोलिसांनी चौकशी करुन बाळाचा व महिलेचा शोध सुरु केला होता. चोरी गेलेले बाळ शोधण्यात नाशिक पोलिसांना यश आले. जिल्हा रुग्णालय आणि पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे चोरी गेलेलं बाळ अवघ्या काही तासात आईच्या कुशीत पोहोचले आहे. पोलिसांनी सपना मराठे (35, रा. धुळे) या महिलेला ताब्यात घेतले आहे.