Maharashtra: ब्रेकअप च्या रागातून ‘तो’ प्रेयसीला लोखंडी पान्याने अमानुषपणे मारत होता…

0
29
ब्रेकअप च्या रागातून 'तो' प्रेयसीला लोखंडी पान्याने अमानुषपणे मारहाण..
ब्रेकअप च्या रागातून 'तो' प्रेयसीला लोखंडी पान्याने अमानुषपणे मारत होता...

आसपास बघ्यांची गर्दी; मात्र कुणीच आलं नाही! मदतीला.

वसई- ब्रेकअप केल्याच्या रागातून प्रियकराने तरुणीवर लोखंडी पान्याने अनेक वार करत हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. वसई पूर्व येथील चिंचपाडा परिसरात आज (मंगळवारी) सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे तरुण तिच्यावर वार करत असताना नागरिक हे दृश्य पाहूनही काहीच न घडल्यासारखे पुढे जात होते. तरुण तिच्यावर एका पाठोपाठ एक वार करत होता, थोड्याच वेळात आजूबाजूला बघ्यांची गर्दी जमली होती. मात्र तरुणीला वाचवण्यासाठी कुणीच पुढे आले नाही. दरम्यान, आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-खासगी-रुग्णालयांना-नोंद/

सीसीटिव्ही फुटेजमध्ये, पीडीत तरुणी रस्त्यावरुन जात असताना आरोपी मागून येतो आणि तिच्या डोक्यात वार करतो. त्यानंतर ती खाली कोसळल्यानंतर तो आणखी तीव्रतेने तिच्यावर वार करतो. तो वार करत असताना सुरुवातीला एक गृहस्थ त्याला अडवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, तो त्यांनाही न जुमानता तिच्यावर वार करणे सुरूच ठेवतो. मात्र हा प्रकार पाहून आजूबाजूला जमलेले लोक फक्त घडलेला प्रकार बघत असतात. तर, काही नागरिक लोक ये-जा करताना सीसीटीव्ही मध्ये दिसत आहेत. आरती यादव (वय 20) असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे. रोहित यादव असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव असल्याचे समजते.

गेल्या काही वर्षांपासून ते शेजारी शेजारी राहत होते. तर गेल्या एक महिन्यांपासून त्यांच्यात वाद-विवाद होते. त्यामुळं त्यांचे ब्रेकअप झाले. पण आरोपीला संशय होता की तरुणीचे दुसऱ्या कोणासोबत प्रेमसंबंध होते. त्याच रागातून आरोपीने तिच्यावर इंडस्ट्रीअल पान्याने वार केले. आरोपीने तिच्यावर तब्बल 15-16 वार केले. या हल्ल्यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही व्हिडिओदेखील समोर आले आहेत. मुलीवर वार होत असताना कोणीही तिला वाचवू शकले असते, मात्र पुढे येऊन तिला वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला नसल्याने माणुसकी मेली असल्याचे संतापजनक चित्र येथे पाहावयास मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here