Maharashtra: माधुरी दीक्षित भाजपतर्फे निवडणूक लढवणार? ‘या’ मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता

0
11
माधुरी दीक्षित भाजपतर्फे निवडणूक लढवणार?
माधुरी दीक्षित भाजपतर्फे निवडणूक लढवणार?

मुबंई- काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीची राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. उमेदवारांनी देखील मतदारसंघावर आपली दावेदारी दाखवण्यास सुरुवात केली आहे.मात्र अशातच आता धकधक गर्ल सुपरस्टार अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-के-टायर-एफएमएससीआय-नॅशन/

येत्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतून भाजपातर्फे माधुरीला तिकीट दिले जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, नेमक्या कोणत्या मतदारसंघातून हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीतही माधुरी दिक्षीत लोकसभेची जागा लढवणार असल्याचे म्हटलं जात होतं. मात्र त्याचे पुढे काहीच झालं नाही. मात्र यंदा माधुरी निवडणूक लढणार असल्याचे म्हटलं जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गणेशोत्सवादरम्यान 23 सप्टेंबरला मुंबईत आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांशी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे म्हटलं जात होतं. या चर्चेनंतर माधुरी दीक्षित-नेने भाजपाच्या तिकिटावर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे कळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here