Maharashtra: ‘रिलायन्स’ कडील पाचही विमानतळ ताब्यात, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे पुन्हा देण्याचा निर्णय

0
14
airport,
'रिलायन्स'कडील पाचही विमानतळ ताब्यात, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे पुन्हा देण्याचा निर्णय

मुबंई- (न्यूज वृत्तसेवा) – अनिल अंबानी यांच्या कंपनीला चालविण्यासाठी दिलेले बारामती, लातूर, नांदेड, यवतमाळ आणि धाराशिव हे पाचही विमानतळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पुन्हा आपल्या ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील अंतर्गत विमानसेवा सक्षम व्हावी यासाठी राज्य सरकारने ते पाच विमानतळ काही वर्षापूर्वी अनिल अंबानी यांच्या ‘रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपमेंट लिमिटेड’ या कंपनीस ९५ वर्षांच्या भाडेपट्टा करारनाम्यावर दिले होते. वरीलपैकी नांदेड विमानतळ ‘स्टार एअर एअरलाईन्स’मार्फत सुरू झाले आहे, तर इतर विमानतळांचे कामकाज ठप्प असल्याने महामंडळाने रिलायन्ससोबतचा करारनामा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-कै-रत्नप्रभा-रमेश-ठाकूर-य/

राज्यातील १८ पैकी केवळ सातच विमानतळ प्रवाशांसाठी उपलब्ध असल्याचा मुद्दा गेल्या वर्षी पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी मांडला होता. त्यावेळी ‘रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स लिमिटेड’ या कंपनीच्या ताब्यात असलेल्या विमानतळांचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला होता. यासंबंधी महाधिवक्त्यांचा अभिप्राय घेऊन निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मागील वर्षभरात यासंबंधी ‘रिलायन्स’ कंपनी, ‘महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलमेंट कॉर्पोरेशन’ आणि महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या काही बैठकाही घेण्यात आल्या होत्या. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ‘रिलायन्स’च्या ताब्यातील पाचही विमानतळ पुन्हा आपल्याकडे घेण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here