मुबंई- बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब्याच्या पट्ट्याची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल झालाय. आज म्हणजेच शनिवारपासून पुढील 4-5 दिवस बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.विदर्भ-मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-रिलायन्स-कडील-पाचही-विम/
याशिवाय मुंबईसह उपनगरातही पाऊस पडण्याचा अंदाज आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रालाही पावसाचा इशारा देण्यात आलाय. घाटमाथ्यावरही पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी महत्वाची कामे लवकर उरकून घ्यावी, असा सल्लाही देण्यात आलाय. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, येत्या 72 तासांत राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस होईल.
साधारणत: 3 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर वाढेल. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याची वाटचाल आता मध्य भारताच्या दिशेने होण्याची शक्यता आहे. सध्या गुजरात किनारपट्टीपासून केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.