🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार/ कल्याण
धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव ना उद्धव ठाकरेंची मालमत्ता आहे, ना एकनाथ शिंदेंची मालमत्ता आहे. ती फक्त बाळासाहेब ठाकरेंची मालमत्ता आहे. आणि ‘राष्ट्रवादी’ हे नाव व घड्याळ हे चिन्ह शरद पवारांचेच अपत्य आहे, असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणावर केला. राजू पाटील यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे हे कल्याणमध्ये आले होते. यादरम्यान घेण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. https://sindhudurgsamachar.in/kokan-सिंधुदुर्ग-जिल्ह्यातील-11/
उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेल्यावर सर्व फोटोवरुन बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरुन हिंदूहृदय सम्राट हे नाव गायब झाले, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. स्वतः च्या स्वार्थासाठी इतक्या खाली गेला. अडीच वर्ष झाल्यावर हे इकडे बघत राहिले ४० खालच्या खाली गेले. आमदार गेल्याचा मुख्यमंत्र्यांना पत्ता नाही, अशी टीका त्यांनी केली. 40 आमदार घेऊन जाणारे एकनाथ शिंदे तेव्हा म्हणाले होते, अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसणे म्हणजे श्वास कोंडण आहे. मग आता अजित पवार मांडीवर येऊन बसले आहेत. मतदारांना गृहीत धरले जात आहे. अशा प्रकारे गद्दारी केलेले लोक मी पाहिले नाहीत. मान खाली घालून जायचे की लोकांसमोर कस जायचं पण आता पक्ष, निशाणी, नाव ताब्यात घ्यायचे, असे मी अध्याय शरदचंद्र पवार यांनी सुरू केला, असा निशाणाही त्यांनी साधला.