युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनसच्या वतीने आझाद मैदान येथे धरणे.
आज युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने बँक कर्मचाऱ्यांना पुरेसे संरक्षण द्यावे, बँकातून पुरेशी नोकर भरती करण्यात यावी आणि बँक कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागण्यासाठी आझाद मैदान मुंबई येथे धरणे संघटित करण्यात आले होते. यात राज्यभरातून 500 वर कर्मचारी अधिकारी यांनी सहभाग घेतला. या धरणे कार्यक्रमाला उद्देशून बोलताना निमंत्रक देविदास तुळजापूरकर यांनी असे सांगितले की, बँकर्स आणि राज्य सरकार यांनी संवेदनशीलता दाखवून बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर तोडगा काढला नाही तर राज्यभरातील सर्व बँक कर्मचाऱ्यांचा 16 नोव्हेंबर चा संप अटळ बनेल. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

यानंतर युनायटेड फोरमचे शिष्टमंडळ श्री ए. एन. भोंडवे उपसचिव महिला व बाल विकास मंत्रालय यांना भेटले व लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी विषद केल्या. त्यावर त्यांनी लवकरच बँक कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी व संबंधित सचिव यांची एक संयुक्त बैठक बोलवण्यात येईल व या प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले. यानंतर हे शिष्टमंडळ इंडियन बँक असोसिएशनचे मनुष्यबळ विभागाचे प्रमुख श्री. ब्रिजेश्र्वर शर्मा यांना भेटले व त्यांना बँक कर्मचाऱ्यांना भेडसावणारे प्रश्न विशद केले. यावर त्यांनी त्वरित हे सर्व प्रश्न इंडियन बँकस असोसिएशन तर्फे सर्व बँक व्यवस्थापनाकडे उपस्थित केले जातील व त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-टीव्हीएस-रेडर-आयजीओसह/
यानंतर युनियनचे शिष्टमंडळ डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस श्रीमती रश्मी शुक्ला यांना भेटले, त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी एफ. आय. आर. दाखल करून घेण्यात टाळाटाळ केली अथवा बँक अधिकाऱ्यांना सहकार्य केले नाही तर तसे आमच्या निदर्शनास आणून द्यावे त्यात त्यांच्या कार्यालयातर्फे त्वरित हस्तक्षेप केला जाईल असे सांगितले.
युनायटेड फोरम तर्फे या आंदोलनाचा एक भाग म्हणून दिवाळीनंतर ट्विटर कॅम्पेन, कॅण्डल मार्च, जिल्हा निहाय धरणे कार्यक्रम संघटित करण्यात येत आहे व शेवटी १६ नोव्हेंबर रोजी बँक कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे.