मुंबई -कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन नव्या व्हेरिएंटमुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बऱ्याच देशांनी आफ्रिकेसहित १३ देशाच्या विमानांना बंदी घातली आहे.त्यातच काल आफ्रिकेतून आलेला डोंबिवलीचा युवक कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.अजून त्याचा ओमिक्रोनचा अहवाल हाती आलेला नाही .
याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने पहिली ते चौथीचे वर्ग तुर्तास सुरू न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे अशी माहिती शिक्षण आयुक्त राजू तडवी यांनीमाहिती दिली आहे.आज महापालिकेत झालेल्या बैठकीत केवळ पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे .