वेंगुर्ला प्रतिनिधी-सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ, सिंधुदुर्गच्यावतीने केवळ भंडारी समाजासाठी वेंगुर्ला कँम्प मैदानावर आयोजीत केलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी चषक-२०२३ या भव्य बक्षिसांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात वेंगुर्ला ‘ब‘ विरूध्द कुडाळ ‘अ‘ या संघात होऊन वेंगुर्ला ‘ब‘ संघाने १७ धावांनी सामना जिंकत रोख रु. २१ हजार व चषक पटकाविला. तर प्रतिस्पर्शी कुडाळ ‘अ‘ संघ उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-आपल्या-माय-मराठीने-अभिज/
सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ, सिंधुदुर्गच्यावतीने भंडारी समाजासाठी आयोजित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी चषक-२०२३ या भव्य बक्षिसांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत जिल्ह्यातील सावंतवाडी अ, सावंतवाडी ब, कुडाळ अ, कुडाळ ब, दोडामार्ग, मालवण अ, मालवण ब, वेंगुर्ल अ, वेंगुर्ल ब असे जिल्ह्यातून ९ संघ सहभागी झाले होते.
या स्पर्धेत सामनावीर सुरेश मांजेरकर, मालिकावीर, सुरज करलकर (कुडाळ संघ), उत्कृष्ट गोलंदाज संतोष शेटकर (कुडाळ), उत्कृष्ट फलंदाज राजन केरकर (वेंगुर्ला), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साईल वेंगुर्लेकर (कुडाळ ब) व उत्कृष्ट यष्टीरक्षक राधाकृष्ण पेडणेकर (वेंगुर्ला ब संघ) यांना महासंघाच्यावतीने चषक देवून सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून सुधीर सारंग, बबी कानडे, प्रमोद भोवर, उदय म्हाडदळकर यांनी, समालोचक म्हणून संतोष मर्ये, मंथन परब, ऋतुराज खाजणेकर, गुणलेखक म्हणून विशाल मर्ये, ओंकार मर्ये, यशवंत किनळेकर यांनी काम पाहिले.
बक्षिस वितरण भंडारी महासंघाचे अध्यक्ष रमण वायंगणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ल्याचे अध्यक्ष अॅड. श्याम गोडकर, सरचिटणीस प्रा. डॉ. आनंद बांदेकर, जिल्हा सरचिटणीस विकास वैद्य, क्रिकेट समिती प्रमुख बाबली वायंगणकर, जयराम वायंगणकर, राजू गवंडे, महासंघाचे उपाध्यक्ष प्रा.संजय खडपकर, समील जळवी, जयपकाश चमणकर, दिपक कोचरेकर, उभादांडा सरपंच निलेश चमणकर, सुनील नाईक, लक्ष्मीकांत मुंडये, दादा वराडकर, गजानन गोलतकर, श्रेया मांजरेकर, अंकिता बांदेकर, सदानंद केरकर, भरत आवळे, बाळ चोडणकर, चंद्रकांत वाडकर, अशोक नाईक, संतोष वैद्य, सत्यवान साटेलकर, विलास मांजरेकर, जया चुडनाईक, रामेश्वरी गवंडे, यशवंत किनळेकर, सुजीत चमणकर, निलेश गोवेकर, मनोहर पालयेकर, कमलाकांत नवार यांच्यासह बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.
फोटोओळी – भंडारी समाजाच्या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या वेंगुर्ला ‘ब‘ संघाला गौरविण्यात आले.