Kokan: आंबा बागायतदारांची नुकसान भरपाईची मागणी

0
59
आंबा बागायतदारांची नुकसान भरपाईची मागणी तहसील कार्यालय येथे जयप्रकाश चमणकर व प्रकाश बोवलेकर यांनी निवेदन सादरकरत केली .
आंबा बागायतदारांची नुकसान भरपाईची मागणी तहसील कार्यालय येथे जयप्रकाश चमणकर व प्रकाश बोवलेकर यांनी निवेदन सादरकरत केली

वेंगुर्ला प्रतिनिधी – सन २०२२-२३ च्या नैसर्गिक आपत्तीमुळे आंबा पिकाची नुकसानी झाली असून जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे कर्जबाजारी झाला आहे व कोकणातील शेतक-यांवर प्रथमच उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने सर्व परिस्थितीचा विचार करून विनाविलंब पंचनामे करून शेतक-यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आंबा काजू उत्पादक बागायतदार संघ सिंधुदुर्गच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनद्वारे करण्यात आली आहे. याबाबत वेंगुर्ला तहसीलदार कार्यालय येथे निवेदन सादर करण्यात आले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-नवे-शैक्षणिक-धोरण-राबवित/

चालू वर्षी हवामानात सातत्याने होणारे बदल्यामुळे आंबा पिकावर किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला आहे. त्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले महागडी कीटकनाशके वापरूनही कीटकावर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. किटकनाशकांसाठी शेतक-यांनी मोठ्या पमाणावर खर्च केला आहे. सकाळचे तापमान २० ते ३१ से. इतके राहत असून या सर्वांचा आंबा पिकावर विपरीत परिणाम झाला असून चालू हंगामात आंबा पिकाचे उत्पादन १० टक्के पेक्षा कमी राहणार आहे. त्याचप्रमाणे मागील दोन महिन्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे आंबा फळावर चट्टे पडले असून अशा मालाची बाजारपेठांमध्ये विक्री होणार नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे कर्जबाजारी झाला असून शेतक-यांनी केलेल्या औषधाचा खर्चही येणा-या उत्पन्नातून भरून येणार नाही. शेतक-यांनी खते व औषधांसाठी केलेला खर्च तसेच बँकांकडून घेतलेले कर्जही परतफेड करणे यंदा शक्य होणार नाही. त्यामुळे शासनाने विनाविलंब पंचनामे करून शेतक-यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी आंबा काजू बागायतदार संघाचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर तसेच प्रकाश बोवलेकरशामसुंदर रायकिशोर नरसुलेविरेंद्र आडारकरसदानंद पेडणेकर आदी उपस्थित होते.

फोटोओळी – तहसील कार्यालय येथे जयप्रकाश चमणकर व प्रकाश बोवलेकर यांनी निवेदन सादर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here