Kokan: जैतिर उत्सवाला फुलला भक्तीचा मळा

0
86
जैतिर उत्सव
जैतिर उत्सवाला फुलला भक्तीचा मळा

वेंगुर्ला प्रतिनिधी- तुळस येथील प्रसिद्ध जैतिर उत्सवाला शुक्रवारपासून प्रारंभ झाला आहे. उत्सवाच्या मुख्य आणि पहिल्या दिवशी ंिसंधुदुर्ग जिल्ह्रासह अन्य ठिकाणांहून भाविकांनी मोठ¬ा प्रमाणात हजेरी लावल्याने मंदिर परिसरात भक्तीचा मळा फुलला होता. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-कौशल्य-विकास-धोरणाच्या/

नराचा नारायण बनलेला हा जैतिर उत्सव तुळस गावातील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. या उत्सवाला माहेरवाशिणींबरोबरच अन्य भाविकही उपस्थिती दर्शवित असतात. त्यामुळे अलोट गर्दी पहायला मिळते. यंदा हा उत्सव 19 मे पासून सुरु झाला आहे. या उत्सवासाठी येणाया भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे तसेच दुकानदारांनाही आपल्या मालाची विक्री व्यवस्थित करता यावी यासाठी देवस्थानतर्फे गेले काही दिवस नियोजन सुरु होते. आज उत्सवादिवशी पहाटेच श्रींची पूजा झाल्यानंतर सकाळपासून भाविकांनी मंदिरात गर्दी करीत श्रींचे दर्शन घेत नवसाची फेड केली. तर नविन नवसही बोलण्यात आले. दुपारनंतर मंदिराकडे भाविकांची गर्दी वाढू लागली. मांडावर खेळणाया देवाचा आशिर्वाद घेण्यासाठी भाविकांची घाई गडबड दिसत होती. तसेच मंदिर परिसरात केळी, नारळ, ओटी, मिठाई, खाद्यपदार्थ तसेच जीवनाश्यक वस्तूंची दुकानेही मांडण्यात आली होती. याठिकाणी भाविक खरेदी करत होते. या उत्सवाची सांगता 28 मे रोजी कवळासाने होणार आहे.

फोटोओळी – जैतिर उत्सवाच्या पहिल्या दिवशी भाविकांनी गर्दी केली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here