रत्नागिरी– गेल्या 11 वर्षापासून बंद असलेली रत्नागिरीतील मिऱ्या येथील भारती शिपयार्ड कंपनी पुनजीवित होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मंत्रालय, मुंबई येथे रत्नागिरीतील भारती शिपयार्ड सुरू करण्यासंदर्भात राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी – रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-news-अंगणवाड्याचे-प्राथमिक/
या बैठकीला एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी मुं अधिकारी विपीन शर्मा, कंपनीचे शिष्टमंडळ व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. गेली ११ वर्ष बंद असलेली शहरातील मिऱ्या येथील भारती शिपयार्ड कंपनी पुन्हा पुनर्जीवित करण्याची मागील काही दिवसांपासून मागणी होत आहे. कंपनी पुन्हा पुनर्जीवित करावी, अशी मागणी ग्रामस्थ, कामगार, ठेकेदारांनी वर्षभरापूर्वी पत्रकार परिषद घेऊन केली होती. न्यायालयाने कोणत्या तरी चांगल्या कंपनीला कंपनी सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी असे सांगण्यात आले होते त्यामुळे ही झालेली बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.