Sindhudurg News: वेंगुर्ला नगरपरिषद हद्दितील ओहोळांवर बंधारा घालण्याबाबत निवेदन

0
90

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला नगरपरिषदेचे नूतन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांची तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने भेट घेऊन शहरात स्वागत करण्यात आले. तर येथील मुख्य ओहोळांवर बंधारा घालण्याबाबत निवेदनही देण्यात आले.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-जिल्हास्तरीय-शालेय-धनु/

वेंगुर्ला नगरपरिषद हद्दितील मुख्य ओहोळातील पाणी कमी झालेले असून त्यातील पाणी अडविण्यासाठी लवकरात लवकर बांध घालणे आवश्यक आहे, जेणेकरून शहरातील विहिरींची पाणी पातळी टिकण्यास त्याची मदत होईल अन्यथा शहरातील नागरिकांना भविष्यात पाणी टंचाई जाणवू शकते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे आपण नगरपरिषदेमार्फत भटवाडी, महाजनवाडी, साकव पुलाजवळ तसेच सुंदरभाटले अशा ठिकाणी जे पाणी अडविण्यासाठी जे बांध घालतो ते लवकरात लवकर घालावे ही विनंती निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष विधाता सावंत, शहर अध्यक्ष प्रकाश डिचोलकर, माजी नगरसेवक कृतिका कुबल, दादा सोकटे आदी उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-वेंगुर्ला-नुतन-मुख्याध/

फोटोओळी – नगरपरिषदेचे नूतन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांचे काँग्रेसच्यावतीने विधाता सावंत यांच्यासह अन्य नगरसेवकांनी स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here