वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला-राऊळवाडा येथील रहिवासी सौ. सुप्रिया (मीना) विलास परब (६५) यांचे ११ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, जावई, दीर, भावजय, पुतणे, पुतणी, नातवंडे असा परिवार आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेचे माजी नगरसेवक विलास परब यांच्या त्या पत्नी होत. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-news-औरंगाबादमधील-भाऊसाहेब/
फोटो – सुप्रिया परब
[…] या अनुषंगाने दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी दोन शनिवारी व दोन रविवारी उपस्थित राहणार आहेत. दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ हा आहे. शनिवार १२ व रविवार १३ नोव्हेंबर व शनिवार २६ व रविवार २७ नोव्हेंबर या दिवशी विशेष मोहिम राबविण्यात आली आहे. यादिवशी केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंदावर उपस्थित राहणार आहेत. तसेच दावे व हरकती स्विकारण्याची कार्यवाही ८ डिसेंबर पर्यंत करण्यात येणार आहे.तालुक्यातील सर्व नवयुवकांनी सदर कार्यक्रमांतर्गत मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना नं.६ भरावा. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अनिवासी मतदाराने नमुना नं. ६ अ भरावा. मतदार यादीतील नावास आक्षेप घेण्यासाठी किंवा नाव वगळण्यासाठी नमुना नं. ७ भरावा. मतदार यादीच्या नोंदीच्या तपशिलामध्ये दुरुस्ती करण्यासाठी तसेच मतदार यादीतील नोंदीचे स्थानांतर करण्यासाठी नमुना नं.८ हा फॉर्म भरावा व आधार प्रमाणिकरणासाठी ६ ब हा फॉर्म भरावा, असे आवाहन वेंगुर्ला तहसिलदार प्रविण लोकरे यांनी केले आहे. http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सौ-सुप्रिया-परब-यांचे-नि/ […]