अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मालवणचा सेवामयी शिक्षक पुरस्कार रामचंद्र वालावलकर यांना जाहीर”

0
130

प्रतिनिधी : अभिमन्यू वेंगुर्लेकर

सावंतवाडी : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मालवण शाखेचा सेवामयी शिक्षक पुरस्कार श्री. रामचंद्र नारायण वालावलकर, केंद्रप्रमुख माडखोल सावंतवाडी (सिंधुदुर्ग) यांना नुकताच जाहीर झाला आहे. रोख रक्कम, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून सदर पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी सकाळ सत्रात १० ते १ या वेळेत जि. प. केंद्रशाळा, माडखोल सभागृह येथे संपन्न होणार आहे https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-सहाय्यक-वायरमन-प्रशिक्/

सदर सोहळा मा. श्री. रामचंद्र विष्णू आंगणे, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक (शिक्षण विभाग जि. प. सिंधुदुर्ग) यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मा. श्रीम. कल्पना राजाराम बोडके, गटशिक्षणाधिकारी सावंतवाडी, विठ्ठल कदम (साहित्यिक), विजय तुकाराम राऊळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष माडखोल नं.१ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे, अशी माहिती सदानंद मनोहर कांबळी, निवड समिती अध्यक्ष सेवामयी शिक्षक पुरस्कार, कथामाला मालवण) यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केली.
प्रतीवर्षी शिक्षण क्षेत्रात साने गुरुजींच्या विचाराने प्रेरित होऊन बालक, पालक आणि समाज यांच्यासाठी तन, मन, धन अर्पण करून सेवा केलेल्या शिक्षकास हा पुरस्कार प्रदान केला जातो.

श्री. वालावलकर यांनी गेली ३३ वर्षे पेंडूर मुगचीवाडी, पेंडूर नं.१ (मालवण), सुरंगपाणी (वेंगुर्ले) चौकुळ, माडखोल (सावंतवाडी) आदी शाळेत शिक्षक व केंद्रप्रमुख म्हणून कार्य केले. प्रत्येक शाळेत विविध शैक्षणिक उपक्रम राबवून समाज शाळेत कसा येईल आणि शाळा समाजात कशी जाईल यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांनी प्रत्येक शाळेत आणि गावागावात ‘शाळा तेथे कथामाला’ हा उपक्रम राबविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here