देशात करोना संसर्ग झाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.कोरोनाच्या विळख्यात सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण अडकले आहेत. आता मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना कोरोना संसर्ग झाल्याचे वृत्त आहे.मोहन जोशी यांनी त्यांच्या कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. मोहन जोशी गोव्याला चित्रीकरणासाठी गेले होते.