अभिनेत्री माधवी गोगटे यांचे मुंबईच्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झाले. माधवी यांच्या पश्चात पती आणि विवाहीत मुलगी असल्याचे सांगण्यात येत आहे. माधवी गोगटे यांनी अनेक मराठी आणि हिंदी टीव्ही मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये भूमिका साकरल्या होत्या. ‘भ्रमाचा भोपळा’ आणि ‘गेला माधव कुणीकडे’ ही त्यांची मराठी नाटके गाजली आहेत. ‘घनचक्कर’ या चित्रपटातील त्यांची भूमिका लोकप्रिय झाली.
माधवी गोगटे यांच्या निधनामुळे मराठीसह हिंदी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.