अभिनेत्री यामी गौतमने चित्रपट दिग्दर्शक आदित्य धरसोबत गुपचूक लग्न केले. यामीने सोशल मीडियाद्वारे आपल्या लग्नाची गोड बातमी दिली. कोरोना परिस्थितीमुळे त्या दोघांनी एका छोटेखानी कार्यक्रमात लग्न केले. यामीच्या लग्नात फक्त तिच्या घरच्यांची उपस्थिती होती.
यामीने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहीले, ‘कुटुंबियांच्या आशिर्वादाने आम्ही विवाहबंधनात अडकलो आहोत. आमच्या लग्नात फक्त कुटुंबातील जवळच्या व्यक्तींना बोलवण्यात आले होते. आमच्या या प्रवासात तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्चा हव्यात.’
हिमाचल प्रदेशातील बिलासपूरच्या यामीने मॉडलिंगमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. तिला फेअर अँड लव्हलीच्या जाहिरातीतून ओळख मिळाली. यानंतर टीव्हीमध्ये चांद के पार चलोमधून आपल्या अभिनयाला सुरुवात केली. तसेच, ‘विक्की डोनर’, ‘काबिल’,’अॅक्शन जॅक्सन’ आणि ‘बाला’सारख्या चित्रपटांमधून यमीने अभिनय केला आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये 2012 मध्ये आलेल्या विक्की डोनरमधून तिने पदार्पण केले.