Maharashtra: अॅलेन करियर इंस्टीट्यूटने रु.१.२५ कोटी रोख पारितोषिक आणि रु.२५० कोटीची शिष्यवृत्ती प्रदान करण्याच्या घोषणेसह  टॅलेंटेक्स २०२४ जाहीर !

0
135
अॅलेन करियर इंस्टीट्यूटने रु.१.२५ कोटी रोख पारितोषिक आणि रु.२५० कोटीची शिष्यवृत्ती प्रदान करण्याच्या घोषणेसह टॅलेंटेक्स २०२४ जाहीर
अॅलेन करियर इंस्टीट्यूटने रु.१.२५ कोटी रोख पारितोषिक आणि रु.२५० कोटीची शिष्यवृत्ती प्रदान करण्याच्या घोषणेसह टॅलेंटेक्स २०२४ जाहीर केले

टॅलेंटेक्स २०२४ इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुले आहे आणि राष्ट्रीय क्रमवारी, मान्यता, रोख बक्षिसे, शिष्यवृत्ती, आणि इतर अनेक फायदे मिळवण्याची संधी देते

मे 17,२०२३: भारतातील अग्रगण्य शिक्षण संस्थाअॅलेन करियर इंस्टीट्यूट प्रायवेट लिमिटेडने (“अॅलेन करियर इंस्टीट्यूट” किंवा “अॅलेन”)(Allen Career Institute २०२४ ) सालच्या टॅलेंटेक्स परीक्षेची दहावी आवृत्ती जाहीर केली. टॅलेंटेक्स इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करता यावे आणि त्यांना कोचिंग फीमध्ये सवलत देऊन त्यांची स्वप्ने साध्य करता यावे यासाठी एक व्यासपीठ आहे. www.tallentex.com या संकेतस्थळाच्या लॉंचमुळे आधीच देशभरातील विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. अर्जाची पहिली मुदत जून ३०, २०२३ आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-माधव-आपटे-चषक-१५-वर्षा/

परीक्षा एकाच टप्प्यात ऑफलाइन घेतली जाईल. ठराविक क्षेत्रांप्रमाणे (झोन) परीक्षा २९ ऑक्टोबर आणि ५ नोव्हेंबर २०२३ रोजी होणार आहेत. राष्ट्रीय आणि राज्य क्रमवारीच्याआधारे रु.२५०कोटी रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती दिली जाईल आणि प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्पर्धात्मक यश निर्देशांक (Competitive Success Index) जारी केला जाईल, यामुळे जर ते जेईई (JEE), नीट (NEET) सीए(CA) आणि सीएस (CS) सारख्या परीक्षांना बसले असतील तर त्यांना त्यांच्या राष्ट्रीय क्रमवारीचा अंदाज येईल. याशिवाय विद्यार्थ्यांच्या करिअर विकासासाठी अत्यंत मौल्यवान असे सहाय्य प्रदान करून गुणवत्तेच्या आधारे १.२५ कोटी रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती आणि रोख बक्षिसे दिली जातील.

टॅलेंटेक्स २०२४ ची घोषणा एक पुस्तिका, संकेतस्थळ आणि पोस्टरच्या विमोचनासह एक कार्यक्रमात अॅलेन करियर इंस्टीट्यूटचे संचालक डॉ श्री. गोविंद माहेश्वरी, डॉ. श्री. नवीन माहेश्वरी, डॉ. श्री. ब्रजेश माहेश्वरी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

टॅलेंटेक्सबाबत बोलताना अॅलेन करियर इंस्टीट्यूट प्रायवेट लिमिटेडचे चेअरमन डॉ. श्री. ब्रजेश माहेश्वरी म्हणाले, टॅलेंटेक्स हे संपूर्ण देशभरातील  हुशार व कुशल विद्यार्थ्यांना ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी हजारो समवयस्कांशी निरोगी स्पर्धेद्वारे त्यांच्या शैक्षणिक क्षमतेची चाचणी घेऊ शकतात. 

टॅलेंटेक्सचे राष्ट्रीय प्रमुख श्री. पंकज अग्रवाल यांच्या मते, ज्या विद्यार्थ्यांनी आधीच अॅलेनच्या क्लासरूम कोर्समध्ये प्रवेश घेतला आहे ते देखील परीक्षेत बसण्यास पात्र आहेत. इच्छुक विद्यार्थीwww.tallentex.com या संकेत स्थळाला भेट देऊन ऑनलाइन किंवा त्यांच्या जवळच्या अॅलेन केंद्रावर जाऊन व तेथे प्रत्यक्ष फॉर्म भरून परीक्षेसाठी नोंदणी करू शकतात. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यास मदत करण्यासाठी विनामूल्य सराव प्रश्नपत्रिका संकेतस्थळावर उपलब्ध असतील. परीक्षा एनसीइआरटी (NCERT) अभ्यासक्रमावर आधारित असेल आणि त्यात भौतिकशास्त्ररसायन शास्त्रगणित, जीवशास्त्र आणि तार्किक मानसिक क्षमता चाचणी या विषयांचे बहूनिवड आणि पूर्णांक प्रकारचे (इंटिजर) प्रश्न असतील.

 अॅलेन टॅलेंटेक्स ही देशातील सर्वात मोठी राष्ट्रीय प्रतिभा शोध परीक्षा (National Talent Search Examination) आणि ऑलिम्पियाड स्तराची परीक्षा आहे. परीक्षा विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक उत्कृष्टतेचे मूल्यांकन करण्याची आणि राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांसाठी स्वतःला तयार करण्याची संधी देणारी परीक्षा आहे. या परीक्षेचा निकाल आणि पारितोषिक वितरण नोव्हेंबर महिन्यामध्ये सक्सेस पॉवर सेशनच्या स्वरूपात जाहीर केला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here