कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. जगभर लसीकरण सुरू आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांना धोका नव्हता पण, आता परिस्थिती बदलली आहे.आता लहान मुलांनाही कोरोनाचा धोका जाणवत आहे. दररोज धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी 4.42 टक्के रुग्ण 10 वर्षांपेक्षा कमी वयाचे असल्याचे नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोलने सांगितले आहे.कोरोना व्हॅक्सीन न घेतलेल्या लोकांना लहान मुलांनी भेटणे सुरक्षित नाही.
तसेच, विना मास्क भेटत असतील, तर धोका आणखी वाढू शकतो. कोरोनाने मुलांमध्ये एकटेपणा, डिप्रेशन, एंग्जाइटीसारख्या अनेक मानसिक समस्या दिसत आहेत. मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.मुलांसाठी कोणतीही लस सध्या उपलब्ध नाही.सर्वात कमी वय म्हणजे २० वर्षाचा मुलगा कोरोनाची लस घेऊ शकतो असे फायजर अँड बायोटेकने सांगितले आहे. त्यामुळे पालकांना आता मुलांची चिंता लागून राहिली आहे.प्रत्येकाने सावधतेने आणि सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून स्वतःच्या सुरक्षिततेबरोबर इतरांचीही काळजी घ्यावी .