आधार कार्ड आणि पॅनकार्ड लिंक करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आधार कार्ड आणि पॅनकार्ड लिंक करण्यासाठी अजून ३ महिन्यांचा अवधी मिळाला आहे. यापूर्वी लिंक करण्याची मुदत ३० जूनपर्यंत होती.
त्यामुळे आधार कार्ड आणि पॅनकार्ड लिंक करण्यासाठी अजून ३ महिन्यांचा अवधी मिळाला आहे.करोना स्थितीमुळे मुदतवाढ देण्यात आल्याचं आयकर विभागाकडून सांगण्यात आलं आहे. पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक न केल्यास पॅनकार्ड निष्क्रिय होणार आहे. त्यामुळे भविष्यात अनेक अडचणींना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.