‘आशिकी प्रसिद्ध संगीतकार श्रवण राठोड यांचे निधन

0
100

प्रसिद्ध संगीतकार जोडी नदीम श्रवणमधील श्रवण राठोड यांचे गुरुवारी संध्याकाळी निधन झाले. दोन दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. नदीम-श्रवणची जोडी 90च्या दशकातील प्रसिद्ध जोडी होती. संगीतकार जोडी नदीम श्रवण यांना खरी ओळख ‘आशिकी’चित्रपटाने मिळवून दिली. कोरोनामुळे त्यांचे फुफ्फुस पूर्णपणे संक्रमित झाले होते. त्यांना डायबिटिज होता. श्रवण यांच्यावर रहेजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. श्रवण यांचे निधन रात्री 9:30 वाजता झाले.

आम्ही आमच्याकडून त्यांना वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न केले. श्रवण यांचा मृत्यू कोरोना संक्रमणामुळे झालेले कार्डियोमायोपॅथी होते. यामुळे पल्मोनरी एडिमा आणि मल्टीपल ऑर्गन फेलियर झाले होते असे रहेजा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले आहे गीतकार समीर यांनी श्रवण यांच्या निधनाची पुष्टी केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here