अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून इंटरनॅशनल ट्रेनिंग सेंटर फुड सेफ्टी ॲण्ड अप्लाईड न्युट्रीशनचा द्वितीय वर्धापन दिन साजरा करण्यात आला. एक्स्पोर्ट इन्स्पेक्शन एजन्सी, मरोल एम आयडी सी अंधेरी येथील या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आज उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला FSSAI भारतीय खाद्य संरक्षण एवं मानके प्राधिकरणच्या अध्यक्षा श्रीमती रिता तेवतीया, मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सिंघल, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव सौरभ विजय आणि आयुक्त परिमल सिंग उपस्थित होते.
यावेळी खाद्य सुरक्षेचे प्रशिक्षणासाठी ITCFSAN च्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. तसेच ‘इट राईट पॅट्रान चॅलेंज’ या स्पर्धेची घोषणा करण्यात आली. यावेळी खाद्य सुरक्षा क्षेत्रातील स्पर्धकांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.