ई पास कसा काढावा याबद्दल सविस्तर माहिती

0
133

शक्यतो कुणीही अनावश्यक प्रवास करू नका. कोरोनाच्या संसर्गापासून स्वतःला आणि इतरांना वाचवा.

१. ई-पाससाठी https:/covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळावर जावे.

2. सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

३. Apply for pass here यावर क्लिक करा.

४. ज्या जिल्ह्यात प्रवास करायचाय तो जिल्हा निवडा. जिल्हा किंवा पोलिस आयुक्तालय निवडा,

५ .आपले संपूर्ण नाव, प्रवास कोणत्या तारखेपासून ते कोणत्या तारखेपर्यंत करणार, मोबाइल नंबर नोंदवा.

६. प्रवासाचे कारण आणि प्रवासाचा उद्देश नोंद करा.

७. वाहनाचा प्रकार, वाहनाचा नोंदणी क्रमांक, सध्याचा पत्ता आणि इ-मेल नोंद करा.

८. प्रवासाला सुरुवात कोठून करणार ते ठिकाण, प्रवासाचे अंतिम ठिकाण, सहप्रवासी संख्या नोदवा.

९. आपण कटेंन्मेंट झोनमधील म्हणजेच कोरोनाचा संसर्ग जास्त असलेल्या भागातून येत आहेत का? होय अथवा नाही त्याची खरी माहिती सांगा.

१०. परतीचा प्रवास याच मार्गाने करणार आहात का तेही लिहा

११. २०० केबीपेक्षा लहान साइजचा फोटो अपलोड करा. आवश्यक ती कागदपत्रे निवडा.

१२. अर्ज सबमिट करा. अर्ज केल्यानंतर एक टोकन आयडी तुम्हाला देण्यात येईल. पडताळणी आणि आवश्यक विभागांची परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही टोकन आयडी क्र. नोंदवून इ-पास डाऊनलोड करून घ्या आणि त्याची प्रिंट काढून घ्या. इ-पासची मूळ कॉपी आणि झेरॉक्सही स्वत:कडे ठेवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here