पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला मुंबईतील मॅजिस्ट्रेट न्यायालयाने 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामिन मंजूर केला नंतर शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.त्यात तिने ‘एका मोठ्या वादळानंतरच सुंदर इंद्रधनुष्य दिसते. हे इंद्रधनुष्य वादळानंतरदेखील अनेक चांगल्या गोष्टी होऊ शकतात हे सांगते.’ असे लिहिले आहे. या पोस्टसह शिल्पाने इंद्रधनुष्य असलेला फोटो शेअर केला आहे. अलीकडेच शिल्पा वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली होती. तेथील तिचे काही फोटोज आणि व्हिडिओदेखील सोशल मीडियावर समोर आले होते.
राज कुंद्राने 2015 मध्ये ‘विआन इंडस्ट्रीज लिमिटेड’ नावाची कंपनी सुरू केली होती. त्या कंपनीमध्ये शिल्पा शेट्टीचे 24.50 टक्के समभाग होते. या कंपनीत शिल्पा एप्रिल 2015 ते जुलै 2020 या कालावधीत संचालक पदावर होती. त्यानंतर तिने संचालकपदाचा राजीनामा वैयक्तिक कारणास्तव दिला असल्याचे साक्षीत सांगितले. हॉटशॉट अॅप व बॉली फेम या संदर्भात आपल्याला काही माहिती नसल्याचे तिने सांगितले. कामात व्यस्त असल्याने पती राज कुंद्रा काय करतो त्यांना माहिती नसल्याचे शिल्पाने जबाबात सांगितले आहे.
राज कुंद्रा स्थानिक पोलिस ठाण्याला कळवल्याशिवाय शहर सोडू शकत नाही असे मुंबईतील मॅजिस्ट्रेट न्यायालयाने जामिन मंजूर करताना लिहिले आहे. .