एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडने गृह कर्जाचे व्याज दर आधीपेक्षा कमी केले आहेत. एलआयसीच्या या विशेष योजनेंतर्गत 31 ऑगस्टपर्यंत 50 लाख रुपयांचे कर्ज घेता येणार आहे.ही योजना केवळ पगारदारांनाच लागू असणार आहे. नवीन व्याज दर कर्ज घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून असून यासाठी त्यांचा सिबील स्कोअर महत्वाचा असणार आहे.