ऐन दिवाळीत एसटीचा प्रवास महागला आहे.एसटीच्या प्रवासात १७.१७ टक्के भाडेवाढ झाली आहे. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून करण्यात येणार आहे .ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर ही भाडेवाढ केल्यामुळे सगळ्यांचाच हिरमोड झाला आहे.
आधीच क्रॉनच्या संक्रमणाच्या झालेली टाळेबंदी, त्यातून घरात आलेले आजारपण,खर्च ,काही घरात झालेला मृत्यू अशा अनेक कारणाने सामान्य माणूस हैराण झालेला आहे.
एस टी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवांना ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. अखेर तिजोरीवर पडलेला भार कमी करण्यासाठी एसटीची भाडेवाढ करण्यात आली आहे असे सांगण्यात आले आहे. नव्या तिकिट दरवाढीनुसार साधी गाडी, शयन-आसनी, शिवशाही तसेच शिवनेरी व अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नसून दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच ६ किमी नंतर तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे.
25 ऑक्टोबर म्हणजे आज मध्यरात्रीपासून ही नवीन भाडेवाढ लागू होणार आहे. ही भाडेवाढ किमान ५ रूपयाने वाढणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र एसटीकडून दिलासा मिळाला आहे .रातराणी गाड्यांच्या तिकिटांचे दर ५ ते १० रुपयांनी कमी होणार असल्याचेही सांगितले आहे