ओमायक्रॉननंतर आता कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट नियोकोवने (NeoCov)पुन्हा जगभरात चिंता

0
80
H3N1
' H1N1इन्फ्ल्यूएंझा आढळताच सरकारी किंवा खासगी दवाखान्यात उपचार घ्या

ओमायक्रॉननंतर आता कोरोनाचा नवीन व्हेरिएंट नियोकोवने पुन्हा एकदा जगभरात चिंता वाढविली आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ‘नियोकोव’ हा व्हेरिएंट सापडला आहे. नवीन व्हेरिएंट नियोकोमुळे दर तीन रुग्णांपैकी एकाचा मृत्यू होऊ शकतो असा खुलासा चीनच्या वुहान येथील वैज्ञानिकांनी दावा केला आहे. नियोकोव व्हेरिएंटचा संसर्ग आणि मृत्यू दोन्ही खूप जास्त आहेत.

रशियन न्यूज एजन्सी स्पुतनिकच्या मते, हा नवीन व्हेरिएंट नाही. हा कोरोना व्हेरिएंट मर्स कोव्ह व्हायरसशी संबंधित आहे. 2012 आणि 2015 मध्ये पश्चिम आशियाई देशांमध्ये याचे रुग्ण पहिल्यांदा आढळून आले होते. हा नियोकोव व्हेरिएंट नुकताच दक्षिण आफ्रिकेत वटवाघुळांमध्ये दिसला आहे. पूर्वी फक्त प्राण्यांमध्ये दिसत होता. नियोकोव आणि त्याचा सहयोगी व्हायरस PDF-2180-CoV मानवांना संक्रमित करू शकतो. वुहान युनिव्हर्सिटी आणि चायना अॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या संशोधकांच्या मते, या नवीन कोरोना व्हायरसने मानवांच्या कोशिकांना संक्रमित करण्यासाठी केवळ एक म्यूटेशनची आवश्यकता आहे. व्हायरसच्या मूळ जीनोमिक संरचनामध्ये होणारे बदल व्हायरसला नवीन स्वरुप देतात, ज्याला व्हेरिएंट म्हणतात.

काही दिवसांपूर्वी फ्रांसमध्ये पसरलेल्या ओमायक्रॉनच्या सब-स्ट्रेनने (BA.2) जगाभरात भीती वाढली होती. या ओमायक्रॉनच्या सब-व्हेरियंटमुळे देखील जास्त धोका आहे कारण आरटी-पीसीआर चाचण्या हा सब-व्हेरियंट सापडत नाही. आतापर्यंत,हा नवीन सब-व्हेरिएंट भारतासह जगातील 40 देशांमध्ये पोहोचला आहे.WHO ने वेळोवेळी कोरोनाच्या कोणत्याही व्हेरिएंटला हलक्यात घेऊ नका असे सांगितले आहे. कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळूनच त्याच्याशी लढायला हवे असे सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here