कांदळवन क्षेत्र संवर्धन व संरक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

0
103

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड क्षेत्रातील कांदळवन क्षेत्र सुरक्षित आणि संवर्धित करणे गरजेचे असून, संरक्षणासाठी अतिरिक्त मनुष्यबळासोबतच सीसीटीव्ही किंवा तत्सम अत्याधुनिक नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल ? याचा अभ्यास करून पुढील कार्यवाहीसाठी अहवाल सादर करावा, अशा सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

मुंबईतील ३९४८.५० हेक्टर पैकी ३९२३.२७ हेक्टर क्षेत्र, ठाणे जिल्ह्यातील ३४५०.२२ हेक्टर पैकी ३०९४.०४ हेक्टर क्षेत्र , पालघर जिल्ह्यातील ३०७३.५९ हेक्टर पैकी २०५६.९३ हेक्टर क्षेत्र तर रायगड जिल्ह्यातील ४४१९.५१ हेक्टर पैकी २९९७.७० हेक्टर क्षेत्र संवर्धनासाठी वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले असल्याची माहिती तसेच मुंबई उपनगरात विविध ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या संरक्षण भिंतींचेही काम पुर्णत्वास येत असल्याचेही माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली.

अद्यापही इतर काही शासकीय यंत्रणांच्या ताब्यात असलेले कांदळवन क्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरित करण्याच्या दृष्टीने बैठक आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले. भारतीय वन अधिनियम कलम 20 अंतर्गत अधिसूचना जारी करण्यावर प्रलंबित क्षेत्राची चौकशी जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here