
वेंगुर्ला प्रतिनिधी- आजगाव येथील पूज्य गोगटे गुरुजी स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या पाचवी ते सातवीसाठीच्या इंग्रजी व्याकरण मार्गदर्शन वर्गाचा सांगता कार्यक्रम आजगाव मराठी शाळेत नुकताच पार पडला. हा कार्यक्रम प्रतिष्ठानचे समन्वयक विनय सौदागर व शाळेच्या मुख्याध्यापिका ममता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-ज्येष्ठ-नेते-शरद-पवारां/
गेले दोन महिन्यांत केलेल्या मार्गदर्शन वर्गात सहभागी घेतलेल्या १८ विद्यार्थ्यांना इंग्रजी-मराठी शब्दकोश भेट देण्यात आले. हे शब्दकोश प्रतिष्ठानच्या विजया आजगावकर-वाडकर यांनी पुरस्कृत केले होते. मार्गदर्शन वर्गादरम्यान घेतलेल्या परीक्षेत यश संपादन केलेल्या खुशी जाधव, गंधार गवंडे व शुभम सावळ यांना रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. समन्वयक विनय सौदागर यांनी या विनामूल्य शैक्षणिक कार्याची माहिती विषद केली. तसेच पुढीलवर्षीही शाळेत शिष्यवृत्ती मार्गदर्शन, इंग्रजी व्याकरण व सायन्सचे मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. पालकांच्यावतीने शहानूर शेख उपस्थित होत्या.
मार्च-एप्रिल मधील या मार्गदर्शन वर्गाचा खुशी परब, किजल मयेकर, साक्षी सुतार, मानसी पांचाळ, गौतम जाधव, शुभम सावळ, सानिया शेख, संचित पांढरे, वैभव पांढरे, गंधार गवंडे, तनवी पांढरे, प्रभाकर मोरजकर, आयान शेख, विष्णू कळसुलकर, दिशा जाधव, दिया सावंत, साहिल भागीत आणि खुशी जाधव या विद्यार्थ्यनी लाभ घेतला. या शैक्षणिक वर्षांत प्रतिष्ठानने केलेल्या सहकार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून पुढील वर्षांतही सहाय्य करण्याची विनंती शाळेच्यावतीने मुख्याध्यापिका ममता जाधव यांनी केली. सूत्रसंचालन व आभार शिक्षक दत्तगुरु कांबळी यांनी मानले. तर कार्यक्रमासाठी शिक्षक निंगोजी कोकीतकर, रुपाली नाईक आणि स्वयंसेविका गौरी आरोलकर यांचे सहाय्य लाभले.
फोटोओळी – इंग्रजी मार्गदर्शन वर्गातील सहभागी विद्यार्थी व आजगाव शाळेतील शिक्षक वर्ग

