कोकण: तुळस येथील जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या विहिरीचे निकृष्ट कामाला कार्यकारी अभियंत्याकडून दणका

0
99
जलजीवन मिशन ,विहिर,
तुळस येथील जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या विहिरीचे निकृष्ट कामाला कार्यकारी अभियंत्याकडून दणका

वेंगुर्ला प्रतिनिधी- जलजीवन मिशन अंतर्गत तुळस-खरीवाडी येथे ठेकेदाराकडून होत असलेले विहीरीचे काम ग्रामीण पाणी पुरवठा विभाग सिंधुदुर्गचे कार्यकारी अभियंता उदयकुमार महाजनी यांनी प्रत्यक्ष पहाणी अंती थांबविले आहे. सदरची विहिपाहून नविन विहीर अभियंता यांचे निगराणीखाली व तांत्रिक मापदंडानुसार नव्याने करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. जलजीवन मिशनच्या कामास ग्रामीण पाणी पुरवठा अधिकायांनी दिलेल्या णक्याची जोरदार चर्चा तुळस गावांसह तालुक्यात होत आहे.https://sindhudurgsamachar.in/कोकण-इंग्रजी-व्याकरण-मार/

जलजीवन मिशन अंतर्गत तुळस-खरीवाडी येथे ठेकेदाराकडून ८३,२७,२०० रूपये किंमतीच्या होत असलेल्या विहिरीच्या कामाची त्यांचेकडे आलेल्या तक्रारीनुसार प्रत्यक्ष तपासणी ग्रामीण पाणी पुरवठा विभाग सिंधुदुर्गचे कार्यकारी अभियंता उदयकुमार महाजनी यांनी २० एप्रिल २०२३ रोजी केली. त्यानुसार २८ एप्रिल रोजी विहीरीचे काम करणा-या ठेकेदारांस, य विहिरीचे काम तांत्रिकदृष्ट्या योग्य प्रकारे होत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे केलेले विहीरीचे बांधकाम पूर्णपणे तोडून पुन्हा तांत्रिक मापदंडानुसार नव्याने विहीरीचे काम करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. हे काम करत असताना विहिरीची पाणी क्षमता भूवैज्ञानिक व उपअभियंता यांचेसमक्ष पुनश्च घेणेचे सुचना दिलेल्या होत्या. परंतु त्याबाबत आपणांकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. मंजूर अंदाजपत्रकानुसार व २० एप्रिल रोजी दिलेल्या सुचनेनुसार योजनेचे काम होणे अपेक्षित आहे. तसेच सदर कामाचा तांत्रिक दर्जा योग्य मापदंडात ठेवणे आवश्यक आहे. यापुढे सदर योजनेचे काम करताना संबधित शाखा अभियंता यांचे निगराणीत काम करू घेषेचे आहे. असे  २८ एप्रिलच्या पत्रान्वये सुचना वजा आदेश देण्यात आलेले आहेत.

      तसेच कामाचा तांत्रिक दर्जा योग्य मापदंडात ठेवणे आवशक आहे. निकृष्ट दर्जाचे काम (निकृष्ट वाळू गंज पकडलेले स्टील वापरून करत असलेले विहिरीचे बांधकाम) पाहण्याचे आदेश दिल्यामुळे १ मे २०२३ रोजी राधाकृष्ण दशरथ गोलतकर यांनी उपोषण स्थगित केले. परंतु येणा-या २० दिवसांत संपूर्ण प्रकरणाची चौकशी न झाल्यास आपण उपोषण करणार असल्याचे  राधाकृष्ण गोलतकर यांनी सांगितले.

      या संदर्भात तुळसमधील ग्रामस्थ राधाकृष्ण गोलतकर यांनी वेंगुर्ला तहसिलदार यांचेकडे तुळस-खरीवाडी येथील जलजीवन मिशन अंतर्गत होणा-या विहिरीचे काम निकृष्ट व शासकिय मापदंडानुसार होत नसल्याबाबत तसेच या कामांत अधिकारी व कांही गावातील पुढारी व्यक्ती यांच्या संगनमताने सदरचे काम चालू ठेऊन गैरव्यवहार करीत आहेत. याबाबतची तक्रार करीत होत असलेल्या निकृष्ट कामाची सखोल चौकशी होऊन कारवाई करावी. अन्यथा आपण १ मे रोजी उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा १७ एप्रिल रोजी दिला होता. मात्र ग्रामीण पाणी पुरवठा विभाग सिंधुदुर्गच्या कार्यकारी अभियंत्यांनी सदर विहीरीचे कामपूर्णपणे पाडून नवीन काम शासनाच्या मापदंडानुसार करण्याचे लेखी पत्र संबधित ठेकेदारास दिले गेल्याने ग्रामस्थ राधाकृष्ण गोलतकर यांनी तहलिदार यांनी केलेल्या सुचनेनुसार सदर उपोषण तात्पुरते स्थगीत केले आहे. मात्र संबधित ठेकेदाराने मनमानीपणे जे काम शासनाच्या मापदंडाशिवाय व अभियंता यांचे निगराणी शिवाय सुरू केले. त्याबाबतची सखोल चौकशी येत्या २० दिवसात व्हावी अशी मागणी केलेली असून तसे न झाल्यास आपण उपोषण आंदोलन छेडू असा इशाराही श्री. गोलतकर यांनी व्यक्त केला आहे.

फोटोओळी – जलजीवन मिशन अंतर्गत तुळस-खरीवाडी येथील विहिर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here