रणधीर कपूर यांना गेल्या आठवड्यात कोरोनाचा संसर्ग झाला होता. कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका दिवसासाठी त्यांना आयसीयूमध्ये हलविण्यात आले होते. रविवारी त्यांना आयसीयूमधून नॉर्मल वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहे.”मी आता पूर्वीपेक्षा चांगला आहे. मी एक दिवस आयसीयूमध्ये होतो. आता डॉक्टरांनी मला आयसीयूमधून नॉर्मल वॉर्डमध्ये हलवले आहे. कारण माझी ऑक्सिजनची पातळी सामान्य असून मला श्वास घेण्यास त्रास होत नाहीये. मला ताप आला होता. पण आता मी पूर्णपणे ठीक आहे,” असे रणधीर सांगितले आहे