क्रुझवर चाललेल्या ड्रग्ज पार्टीवर NCB चा छापा

0
90

मुंबईजवळच्या सुमद्रात एका मोठ्या आलिशान क्रुझवर सुरु असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने छापा टाकला. एनसीबीने शनिवारी रात्री ही कारवाई केली.एका बॉलिवूड सेलिब्रिटीच्या मुलासह 10 जणांना ताब्यात घेतले आहे. या क्रुझवरुन मोठ्याप्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांना या क्रुझवर ड्रग्ज पार्टी होणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी ही कारवाई केली आहे.

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी पार्टीच्या ठिकाणावरुन कोकोन, चरस, एमडी, गांजा यासारखी आमली पदार्थ जप्त केली आहेत. या क्रुझवर एनसीबीचे अधिकारी प्रवासी म्हणून प्रवास करत होते. त्यामुळे क्रुझवरील लोकांना त्याची चाहूल लागली नाही. ही क्रुझ जेव्हा समुद्रात मध्यावर पोहचली त्यावेळी ड्रग्ज पार्टीला सुरुवात झाली. यावेळी अनेकांना एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. यामध्ये एका बॉलिवूड सेलिब्रिटीच्या मुलाचा समावेश आहे. असे एकूण 10 जणांना एनसीबीने ताब्यात घेतले आहे.

 हे क्रुझ शनिवारी रात्री मुंबईवरुन गोव्याला जाऊन सोमवारी सकाळी परत मुंबईला येणार होते. या क्रुझवर पार्टीचे देखील आयोजन करण्यात आले होते. आयोजकांनी पार्टीसाठी मोठ्याप्रमाणात ड्रग्ज मागवले होते. याची माहिती एनसीबीला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. तब्बल सात तासांपेक्षा जास्त वेळ एनसीबीचे हे ऑपरेशन सुरु होते. ड्रग्ज पार्टीत सहभागी झालेल्या या 10 जणांना मुंबईमध्ये आणण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here