चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर!

0
84

चीनमध्ये पुन्हा कोरोनाने कहर केल्याने चिंतेत वाढ झाली आहे.त्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.चीन मीडियाने शुक्रवारी याबाबत ही माहिती दिली.आशियाई क्रीडा स्पर्धाचे आयोजन शांघायजवळील चीनच्या हांगझोऊ या शहराने केले होते.

आशिया ऑलिम्पिक कॉन्सिलने शुक्रवारी सांगितले की, 10 ते 25 सप्टेंबर 2022 या कालावधीत चीनमधील हांगझोऊ येथे होणार्‍या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. स्पर्धा पुढे ढकलण्याचे कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. पण चीनमध्ये कोविड-19 शी संबंधित प्रकरणे सातत्याने वाढत असताना ही घोषणा करण्यात आली आहे.चीनमधील सर्वात मोठे शहर शांघाय येथेही आठवडाभराचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here