ज्येष्ठांच्या आरोग्य विम्यावरील जीएसटी माफ होण्याची शक्यता

0
24
आरोग्य विम्यावरील जीएसटी माफ ?
ज्येष्ठांच्या आरोग्य विम्यावरील जीएसटी माफ होण्याची शक्यता

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचारनवी दिल्ली/ 22 ऑक्टोबर

ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुर्विमा आणि आरोग्य विम्यावर जीएसटी मुक्त होण्याची शक्यता आहे. प्रीमियम देखील करमुक्त होऊ शकते. जीवन आणि आरोग्य विम्यावरील जीएसटी दर ठरवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिसमुहाच्या बैठकीत या विषयावर एकमत झाले आहे. मात्र, यावर अंतिम निर्णय जीएसटी परिषदेच्या बैठकीत घेतला जाणार आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-रेल्वे-विभाग-सेवानिवृत/

आता ज्येष्ठ नागरिकांनी जीवन विमा आणि आरोग्य विम्यासाठी भरलेले प्रीमियम करमुक्त केले जाऊ शकते. याशिवाय, इतर व्यक्तींसाठी ५ लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य विम्यासाठी भरलेल्या प्रीमियमला जीएसटीमधून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला.५ लाखांपेक्षा जास्त आरोग्य विमा संरक्षणासाठी भरलेल्या प्रीमियमवर १८ टक्के जीएसटी लागू राहील. मंत्रिसमुहाच्या बैठकीत सदस्यांनी विमा प्रीमियमवरील दर कमी करण्यास मोठ्या प्रमाणावर सहमती दर्शविली. बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना या समुहाचे संयोजक बनवण्यात आले आहे. या बैठकीनंतर चौधरी ते म्हणाले की, मंत्रीसमुहातील प्रत्येक सदस्याला लोकांना दिलासा द्यायचा आहे.ज्येष्ठ नागरिकांवर विशेष लक्ष दिले जाईल.आम्ही परिषदेला अहवाल सादर करू. अंतिम निर्णय परिषद घेईल. मात्र,ज्येष्ठ नागरिकांसाठी रक्कम विचारात न घेता, भरलेल्या विमा प्रीमियमवर कोणताही जीएसटी लावला जावू शकत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here